Share

‘भाजपला भारतनानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे ?’

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. दरम्यान, जर भारतनानांच्या पत्नीला उमेदवारी दिली असती तर निवडणूक बिनविरोध केली असती, असं वक्तव्य देखील भाजपच्या काही नेत्यांनी केलं आहे.

तर, भाजपची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नसल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रचारसभेत सांगितलं आहे. . राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे, असं पडळकर म्हणाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी भाजपच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

https://www.facebook.com/JayantRPatilofficial/posts/2237071979756763

पंढरपूर येथील शिवतीर्थावर झालेल्या सभेत हजारोंचा जमाव जमला होता. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारतनानांबद्दल आदर आहे. भाजपला भारतनानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे? मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील.’ असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!