Share

उद्धवजी, याजसाठी केला का अट्टाहास? पंढरपुरातील ही गर्दी तुम्हाला दिसत नाही का?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आज रात्री ८ वाजेपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री फेसबूकवर लाईव्ह येत यासंबंधीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी राज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, हे सर्व निर्बंध पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लागू केल्या जाणार नाही. पंढरपूरला मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. पण मतदान पार पडल्यानंतर या मतदारसंघातही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत असणार आहे. यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून बंदिस्त ठिकाणी २०० व्यक्ती किंवा ५० टक्के क्षमता यापैकी जे कमी असेल त्यानुसार राजकीय सभा घेण्यास परवानगी द्यावी. तर खुल्या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने आणि केंद्र शासनाने कोरोना संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचाराच्या प्रयोजनार्थ राजकीय सभा घेण्यास परवानगी द्यावी अशी अट घालण्यात आली आहे.

पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला हजारो लोकांची गर्दी जमली होती. राज्य सरकारच्या मंत्र्यांने सभा घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावणार हे निश्चित आहे. सभेला गर्दी होणार, होत आहे तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभेसाठी परवानगी का दिली हा मोठा प्रश्न आहे. कारण हल्ली डिजिटल माध्यमातूनही प्रचार करण्यात येतो. स्वत: मुख्यमंत्री गेल्या वर्षभरापासून राज्यातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधत आहे याचा त्यांना विसर पडला असावा.

लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया मोठी असते. केवळ मतदानासाठीच निर्बंध शिथील करण्यास हवे होते. पण उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. यामुळे सुजान नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. उद्धवजी, याजसाठी केला का अट्टहास, तुम्हाला जयंत पाटलांच्या सभेतील गर्दी दिसली नाही का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. दरम्यान, या सभेच्या आयोजकांवर आणि गर्दी जमवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या मंत्री जयंत पाटलांवर ठाकरे सरकार कारवाई करणार असा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!