Share

शरद पवार यांच्यानंतर भाजप आमदाराने घरीच घेतली कोरोना लस, टीकेची झोड सुरू

Published On: 

पाटणा : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी कोरोना लस घेतली होती. यावरून बरेच वाद निर्माण झाले होते. शिवाय एकाने कोर्टात देखील घरी लस घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. यापुढे कोणत्याही राजकीय नेत्याने घरी लस घेतल्यास कारवाईचा इशारा कोर्टाने दिला होता. यानंतर बिहारमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. तेथील भाजप आमदाराने चक्क डॉक्टरांनाच घरी बोलावून स्वतःचे लसीकरण करून घेतल्याचे उघडकीस आले आहे.

या आमदाराचे नाव अशोक सिंग आहे. ते मुज्जफरपूरमधील पारू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी स्वतःच्या लसीकरणासाठी रूग्णलाय किंवा लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. या प्रकारचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून, यामध्ये वैद्यकीय कर्मचारी या आमदारास त्याच्या घरीच लस देत असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण भारतात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लस उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान मोदींनी आवाहन केले आहे. लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी लस तुटवड्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. पण बिहारमध्ये एका आमदाराने आरोग्य यंत्रणेला घरी बोलावत लस घेतली. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच लसीकरणाबाबतच्या नियमांचा भंग केल्याने जोरदार टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!