Share

प्राध्यापक, विद्यार्थ्यांनो कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे : अमित देशमुख

Published On: 

🕒 1 min read

लातूर : प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व हेल्थ वर्कर्स या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. ज्या संस्था शासनाची मानके पूर्ण करीत असतील त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घ्या. वैद्यकीय शिक्षण संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर्स हे सर्व हेल्थ वर्कर्स असून या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील देशमुख यांनी यावेळी केले.

वैद्यकीय शिक्षण विभागाची महाविद्यालये, रुग्णालये यांच्या सुविधा आणि सुरू असलेल्या कामाची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला अधिष्ठात्यांनी देण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा  विस्तार करण्याची आवश्यकता आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधन सामुग्रीची संख्या वाढवण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी आज दिली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

 वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा

कोरोना – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असेल, त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

गारपीट तसेच वादळी पावसाने नुकसानीचे पंचनामे करा 

जिल्हातील रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात रविवारी (दि. ११) रोजी दुपारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि मोठी गारपीट झाली होती. त्यामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!