🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या सुरु असलेल्या सामन्यादरम्यान सध्या एका जाहीरातीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. या जाहीरातीत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड स्वत: ला इंदिरानगरचा गुंडा म्हणतो. हेच कॅप्शन वापरत भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने एक ट्विट करत १९९६ च्या विश्वचषकातील अमिर सोहेलला बाद केल्याचा फोटो शेअर केला.
मात्र या पोस्टच्या कमेंटमध्ये पाकिस्तानच्या चाहत्याने वेंकटेश प्रसादला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर वेंकटेश प्रसादने असे काही उत्तर दिले की त्या ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली. या पोस्टमध्ये कमेंट करताना पाकिस्तानचा चाहता प्रसादला म्हणाला तुझ्या करिअरमधील एकमेव गौरवाची बाब आहे. यावर उत्तर देताना प्रसाद म्हणाला की, ‘नाही मित्रा त्यांनतरच्या १९९९ विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडमध्ये मी पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ गडी बाद केले होते. त्यावेळी पाकिस्तानला २२८ धावांचे लक्ष्यही पार करता आले नाही. असे म्हणत देवाचे आशिर्वाद नेहमी तुझ्या सोबत असो असे प्रसाद म्हणाला.
Me to Aamir Sohail in Bangalore at 14.5- #IndiraNagarkaGunda hoon main ???? pic.twitter.com/uF7xaPeTPl
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) April 11, 2021
१९९०च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाची गोलंदाजी वेंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ हे संभाळत होते. १९९६ च्या विश्वचषकातील क्वार्टर फायनलमध्ये अमिर सोहेल आणि प्रसाद यांच्यातील लढत आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या सामन्यात प्रसादने सोहेलचा बळी घेतल्यानंतर ज्या पद्धतीने सोहेलला मैदानाबाहेर जायला सांगितले होते ते भारतीय चाहते कधिच विसरु शकणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवत नितीशने केले सेलिब्रेशन ; खास व्यक्तीला समर्पित केली ही खेळी
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- मोइन अलीने टाकलेल्या मून बॉलवर धोनीचा मौके पे चौका
- ‘त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले’ ; पंतच्या नेतृत्वाचे धवन कडून कौतुक
- प्रवीण अमरेंमुळे उत्तम कामगिरी करू शकलो : पृथ्वी शॉ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

