Share

अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवत नितीशने केले सेलिब्रेशन ; खास व्यक्तीला समर्पित केली ही खेळी

Published On: 

चेन्नई : इनडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत करत मालिका जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 षटकांत  187 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 5 गडी बाद 177 धावा करू शकली. कोलकात्याच्या विजयात महत्तपूर्ण भूमिका नितीश राणाने बजावली.

आयपीएल सुरु होण्याअगोदर बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. काही खेळाडू कोरोनातून बरे होऊन आपल्या संघात दाखल झाले आहेत. त्यातच नितीश राणाला देखील कोरोनाची लागणं झाली होती. मात्र, त्याने काहीच दिवसांत कोरोनावर मात केली आणि संघात दाखल झाला. कोरोनाविरुद्धची मॅच तर जिंकलीच तसंच क्रिकेटच्या मैदानात उतरुन कोलकात्याला विजयी सलामी देण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला.

या सामन्यात नितीश राणाने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या मोसमातील अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने आयपीएलमधील 12 वं अर्धशतक पूर्ण केलं. दमदार अर्धशतकानंतर त्याने खास सेलिब्रेशनही केलं. आपल्या बोटातली रिंग दाखवत त्याने खास व्यक्तीला ही खेळी समर्पित केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!