Share

राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

राज्यात रविवारी 63,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34,008 बरे झाले झाले आहेत. या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ही 34,07,245 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून राज्यात सध्या 5,65,587 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मुंबईमध्ये कोरोनाचे 9,989 नवे रुग्ण सापडले आहेत. नागपूर जिल्ह्यात रविवारी 7,201 नवे कोरोनाबाधित. 63 मृत्यू. 3,240 बरे झाले. राज्यात तब्बल 7883 रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले होते. 309 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईत हा आकडा 9327 एवढा होता.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!