मुंबई : आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतच्या दिल्ली कॅपीटलने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा ७ गडी राखुन पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून शिखर धवनने ८५ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या सामन्यात चेन्नईचे सर्व गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.
सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. नंतर अलेल्या सुरेश रैना आणि मोईन अली यांनी संघाचा डाव सावरला. तर आखेरच्या षटकांत सॅम करन आणि रविंद्र जडेजा यांनी फटकेबाजी करच चेन्नईला १८८ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र या सामन्यात कर्णधार धोनी भोपळाही न फोडता बाद झाला. दुसऱ्या डावात दिल्लीच्या फलंदाजानी चेन्नईच्या संघाला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.
मात्र शिखर धवन आणि पृथ्वी शॉ फलंदाजी करत असताना मोईन अलीने बळी मिळवण्यासाठी चक्क मुन बॉल टाकला. हा चेंडु मारण्यासाठी शिखर धवन पुढे आला. मात्र चेंडु फार उचांवरुन गेल्याने तो थेट धोनीच्या हातात गेला आणि कर्णधार धोनीने क्षणाचाही विलंब न करता शिखरला यष्टिचीत केले. पण हा चेंडु कंबरेच्या वर असल्याने स्वेअर लेग येथील पंचाने हा चेंडु नो बॉल असल्याचे सांगितले. बळी जरी मिळाला नसला तरी धोनीच्या यष्टिरक्षणाचे कौतुक सर्वजण करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रवीण अमरेंमुळे उत्तम कामगिरी करू शकलो : पृथ्वी शॉ
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- कोरोनावर मात केलेल्या राणाचे नाणे खणखणीत वाजले; 80 धावांची खेळी करुन उचलला विजयात मोलाचा वाटा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

