चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत करत मालिका जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 षटकांत 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 5 गडी बाद 177 धावा करू शकली. कोलकात्याच्या विजयात महत्तपूर्ण भूमिका बजावली ती म्हणजे नितीश राणा.
आयपीएल सुरु होण्याअगोदर बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. काही खेळाडूं कोरोनातून बरे होऊन आपल्या संघात देखील झाले आहेत. त्यातच नितीश राणाला देखील कोरोनाची लागणं झाली होती. मात्र, त्याने काहीच दिवसांत कोरोना मात केली आणि संघात दाखल झाला. कोरोनाविरुद्धची मॅच तर जिंकलीच तसंच क्रिकेटच्या मैदानात उतरुन कोलकात्याला विजयी सलामी देण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला.
या सामन्यात नितीश राणाने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या मोसमातील अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने आयपीएलमधील 12 वं अर्धशतक पूर्ण केलं. या डावात त्याने राहुल त्रिपाठीची देखील तेवढीच साथ दिली राहुलबरोबर त्याने 93 धावांची भागिदरी करुन संघाला आवश्यक तेवढ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन गेला.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
