जालना : कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.
राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर पुन्हा एकदा होणार शस्त्रक्रिया; ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

