🕒 1 min read
लातूर : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असतांना एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे आगामी काळात होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्यातील अनेक नेत्यांनी केली आहे. वैद्यकीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनेही तशी मागणी करण्यात येत आहे. यावर सकारात्मक विचार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू देणार नसल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी सोशल मीडियावर या संबंधी पोस्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यातील काही पोस्टला अमित देशमुख यांनी उत्तरही दिले आहे. यात अमित देशमुख म्हणतात की, ‘मी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहे, कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. संबंधितांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आपण केलेल्या सूचनांसाठी धन्यवाद.’
मी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहे, कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. संबंधितांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आपण केलेल्या सूचनांसाठी धन्यवाद. https://t.co/BlJutnhVxL
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 10, 2021
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यातच परीक्षा घेतल्यास त्यांच्यावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचेही मोठे आव्हान आहे. त्यामुळे आगामी काळात या बाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर पुन्हा एकदा होणार शस्त्रक्रिया; ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

