🕒 1 min read
जालना: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यस्तरीय शिक्षक संमेलन होणार असून आरोग्याची काळजी घेत राज्यस्तरीय शिक्षक संमेलन होणार असून ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळातर्फे ११ व १२ एप्रिल रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. या वेळी पुरस्कार वितरण सोहळा देखील होणार असून शासनाच्या आवाहनानुसार हा सोहळा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या वेळी प्रत्येक जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा जिल्हाध्यक्षासह सन्मान करण्यात येणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात पुस्तक प्रदर्शन, कला प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून मंडळाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
शिक्षक संमेलनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, क्रीडामंत्री, ग्रामविकासमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासह मान्यवरांना आमंत्रणे पाठवण्यात आली असून मंडळाचे संस्थापक व राज्यध्यक्ष नटराज मोरे हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षकांनी ऑनलाइन उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्य सचिव विजय जोगमार्ग तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मोदींचे बंगाली भाषा कार्ड
- उस्मानाबाद: उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्याने उपचार बंद, सामान्य रुग्णांची हाेतेय गैरसाेय
- आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण नसताना बायो-बबलमध्ये प्रवेश ; अन्य टीमनं व्यक्त केली नाराजी
- महाराष्ट्रातील नेत्यांना लस घरात बसून कशी मिळते ? ठाकरे सरकारला हायकोर्टाने झापले
- मॅक्सवेलचा तुफान षटकार पाहून कोहली हैराण : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

