🕒 1 min read
चेन्नई : कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. . रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ आगामी काही भारतीय खेळाडूंमध्ये सामील होऊन आवश्यक संतुलन स्थापित करुन आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चॅम्पियन बनण्याची तयारी दर्शवित आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलचा जलवा पाहायला मिळाला. RCBसंघातून डेब्यू करत त्याने पहिलाच षटकार ठोकला. हा षटकार इतका जबरदस्त होता की त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मॅक्सवेलने मारलेला षटकार इतका जबरदस्त होता की थेट बॉल स्टेडियम बाहेर गेला. ग्लॅम मॅक्सवेलनं मैदानात येताच 100 मीटर लांब षटकार ठोकल्यानं त्याचं कौतुक होत आहे.
https://twitter.com/QuickWristSpin/status/1380566816301322241?s=20
आरसीबीकडे डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलसारखे ‘बिग हिटर्स’ आहेत. सर्वांच्या नजरा मॅक्सवेलच्या फॉर्मवर राहणार आहेत. जर त्याने कोहली आणि डिव्हिलियर्ससह आपले पूर्ण योगदान दिले तर ही त्रिकुटी कोणत्याही संघासाठी सर्वात मोठा धोका ठरेल. आणि विजयचा दावेदार देखील बनेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- पंत आणि धोनी आमने-सामने ; आज रंगणार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना
- कोरोना कहर! लातूर जिल्ह्यात १४०४ विक्रमी रूग्णसंख्या
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- चिंताजनक! लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

