Share

आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण नसताना बायो-बबलमध्ये प्रवेश ; अन्य टीमनं व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे काल झालेल्या सामन्यात त्याला खेळवण्यात आले नाही. आता पडिक्कल करोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. देवदत्तला करोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. पण, आता तो लवकरच संघात सामील होणार आहे.

मात्र, देवदत्त पडिक्कलला कोरोनातून बरा झाल्यानंतर त्याला लगेच टीमच्या बयो-बबलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या निर्णयावर अन्य आयपीएल टीमनं नाराजी व्यक्त केली आहे. पडिक्कलला सात दिवसांचा बंधनकारक क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच बायो-बबलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. देवदत्तला 22 मार्च रोजी कोरोना झाला होता. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. कोरोनातून बरं होताच 7 एप्रिल रोजी तो आरसीबीच्या टीममध्ये दाखल झाला आहे.

आरसीबीच्या मॅनेजमेंटमधीाल सदस्यानं या विषयावर ‘क्रिकबझ’शी बोलताना सर्व नियमांचं पालन केल्याचा दावा केला आहे. देवदत्तचे तीन कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यानंतर तो 7 एप्रिल रोजी टीममध्ये दाखल झाला. मात्र असे असले तरीदेखील बाकीच्या टीमनं नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!