Share

मोफत आरटीई प्रवेश देऊनही निधी मिळेना, मेस्टा संघटनेकडून शासन आदेशाची होळी!

Published On: 

औरंगाबाद : आरटीई अंतर्गत शासनाने ५० कोटी रुपये देण्याचा शासन आदेश काढला आहे. यावर इंग्रजी शाळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने सोमवारी (दि.५) सकाळी चेलीपुरा हायस्कूल येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी करून आरटीई फी परतावा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

मागील वर्षभरापासून राज्यातील साडेसहा लाख शिक्षक व दीड लाख शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आहे. उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही शिक्षक भाजीपाला विकतात, काही हातगाडीवर सॅनिटायझर तर काहींनी वडापावचे गाडे सुरु करण्याची वेळ आली. तरीही काही यंत्रणा माहीत नसतांना वर्षभर मुलांना ऑनलाईन शिकवले.

परंतु पालक फी भरत नाही आणि सरकार लक्ष देत नाही. म्हणून सरकारने यांना  मानधन दिले पाहिजे, तसेच शासनाने आरटीईचा फी परतावा साडे अठराशे कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु शासनाने केवळ ५० कोटी रुपयांचा फी परतावा देण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी मेस्टाचे अध्यक्ष संजयराव तायडे, मनीष हंडे, राजीव नगरकर, प्रवीण अग्रवाल, एस.एन.नायर, नवनाथ पवार, नानासाहेब परभने, प्रवीण सरकटे, डॉ. गजानन नालमवार सह आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!