Share

राज्यात कडक निर्बंध ; आयपीएलच्या सामन्यांना महाराष्ट्र सरकारची परवानगी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे. अशा स्थितीत मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक पार पडली आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही कडक निर्बंध घालण्यात आले. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे सामने मुंबईत होणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम होतं. पण, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएल २०२१चे सामने ठरल्याप्रमाणे मुंबईतच होतील, अशी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!