Share

‘भगीरथच’ पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर – भारतनानांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. ती स्वप्न भारतनानांचा भगीरथच पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात वातावरण सकारात्मक आहे, आघाडीचा विजय निश्चित आहे. स्व. भारत नानांनी उभारलेल्या अविरत कार्यामुळे जनता भगीरथ भालके यांना मतरुपी आशीर्वाद देणार हा विश्वास आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर-मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. जवळपास १२ वर्षाहून अधिक काळ महात्मा बसवेश्वर मंगळवेढ्यात राहिले. त्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक व्हावे ही भारतनानांची मागणी होती. लोकांच्या भक्ती भावनांचा आदर करत यावर्षीच्या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी या स्मारकाची तरतूदही केली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भारतनाना माझ्याकडे २४ गावांच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आले होते. भाजपा सरकारच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आपले सरकार येताच अधिकाऱ्यांच्या बैठका लावून या गावांना २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!