🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे.
यामुळेच विरोधी पक्षांनी कोरोना आळा घालण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील लॉकडाऊन बाबत चर्चा केली आहे.
याबाबत, मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं’ अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे, राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
फडणवीस-ठाकरेंची फोनद्वारे चर्चा –
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोरोनाग्रस्त आहेत. फोनद्वारे फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंच्या स्वास्थ्याची चौकशी केली आहे. सध्या रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
यासोबतच, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार जे कडक निर्बंध लागू करेल विरोधी पक्षाने देखील सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असं सूत्रांच्या माहितीद्वारे समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता गोविंदालाही कोरोनाची लागण
- विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
