कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका-टिप्पणी सुरु असल्याचं कायम दिसून येत असतं. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या संबोधनावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं. यानंतर पुण्यात महिलेच्या जागेवर उभे राहावे लागते, यावरुन त्यांची लोकप्रियता कळते’ असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
यासोबतच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दिल्ली भाजप मीडियासेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या टिकेवरून भाजपने माफी मागावी अशी मागणी मुश्रीफ यांनी केली होती. यावरून देखील त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या भाष्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून?’ असं एकेरी भाष्य केलं असून टीका करताना त्यांचा तोल घसरल्याचे देखील दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावाच लागेल, अजित पवारांचा इशारा
- लसीचे दोन डोस घेऊनही औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय कोरोना पॉझिटिव्ह
- सीएसकेसाठी धोनी जोरदार पुनरागमन करेल का? यावेळी आव्हान मोठे
- कोरोना जगात नाही याची खात्री पटतेय, म्हणून मीही मास्क काढला; जयंत पाटलांच बेजबाबदार वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

