मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.
यात बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला कोरोनाची लागण झाली. याची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली. आज सकाळी अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अक्षय कुमार ट्विट करून म्हणाला, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन देखील अक्षय कुमारने केले आहे.
अभिनेता अक्षय कुमार याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गोविंदा सध्या घरात विलगीकरणात राहात असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सकाळीच माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला मला सौम्य लक्षणे जाणवत आहेत. घरातील इतर सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पत्नी सुनिता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेता गोविंदा याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा थैमान, घाटीत आणखी अठरा रुग्णांचा मृत्यू
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
- विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर
- ‘जान है तो जहान है’ असं म्हणत जीम मालकांचा लॉकडाऊनला पाठींबा
- ‘जान है तो जहान है’ असं म्हणत जीम मालकांचा लॉकडाऊनला पाठींबा


