🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोरोनाग्रस्त आहेत. फोनद्वारे फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंच्या स्वास्थ्याची चौकशी केली आहे. सध्या रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
यासोबतच, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार जे कडक निर्बंध लागू करेल विरोधी पक्षाने देखील सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असं काही सूत्रांकडून समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- लसीचे दोन डोस घेऊनही औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय कोरोना पॉझिटिव्ह
- विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’

