औरंगाबाद : महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ञास जाणवल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला होता. रविवारी (दि.४) सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पांडेय यांनी कोरोना लसीकरणाचा दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खुद्द प्रशासकच कोरोना पॉझीटिव्ह आल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे प्रमुख अधिकारी कोरोना पॉझीटिव्ह झाले आहेत. आता प्रमुख अधिकारीच कोरोनाग्रस्त झाल्याने महापालिकेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयुक्तांना काल ताप आल्याचे जाणवले.
त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला. माञ त्यांच्यात साधारण लक्षणे जाणवले आहेत. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोडकर यांनी दिली. दरम्यान आयुक्त पांडेय यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आता पालिकेचे कामकाज आणखी ढेपाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पांडेय होम आयसोलेट होण्याच्या तयारीत असल्याचे सूञांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
- ‘मास्क वापरला तर ब्युटी पार्लर कसे चालणार ?’ आसामच्या आरोग्य मंत्र्यांच अजब विधान
- सीएसकेसाठी धोनी जोरदार पुनरागमन करेल का? यावेळी आव्हान मोठे
- मे अखेरपर्यंत देशभरात कोरोनाचा हाहाकार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं सांगितलं ‘इतकी’ असेल रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
