जळगाव : दि. १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली होती. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे असूनही शिवसेनेनं महापालिकेत झेंडा फडकावला आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे.
भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला होता. भाजपच्या २७ हुन अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे जळगाव मध्ये भाजपचा पराभव झाला. जळगावातील या पराभवामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाराजन यांना मोठा धक्का मानला जात आहे.
गिरीश महाजन यांनी या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यासाठी भाजपकडून आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता या नगरसेवकांवर कारवाई होणार का ? हे औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पडेगावातील हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार! शहरात एकच खळबळ
- शरद पवारांच्या उत्तम आरोग्यासाठी कार्यकर्त्यांकडून राज्यभर होमहवन
- ‘अनिल देशमुखांवरील समिती म्हणजे जनतेला एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’
- ‘ “परमवीर” घोड्याचे रूपांतर “शरमवीर” मध्ये होऊन भक्तांची तोंडं काळी होण्यास सुरुवात झालीये’
- १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी; हायकोर्टात याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

