Share

मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी केले रोहित-विराटमध्ये पॅचअप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मागील दोन वर्षांपासून मतभेद असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली. या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे मैदानातील वागणं आणि सोशल साइटवर ‘अनफॉलो’ करणे यामुळे दोघांमधील वाद सर्वांसमोर येत होते.

पण इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत दोघांची मैत्री क्रिकेटच्या पिचवर दिसून आली. कोरोनाच्या काळात विलगीकरण, क्वारंटाइनमुळे अधिकाधिक वेळ दोघांनी एकमेकांसोबत घालवला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्गदर्शन करीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले.

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत होते. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्याची नितांत गरज होती. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. विराट कोहली व रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने एकमेकांशी संवाद साधत होते. टी-20 मालिका संपल्यानंतर फोटोसाठीही दोघे एकत्र आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!