Share

‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात सध्या ५ राज्यात निवडणुकांचे रण तापले असून यामध्ये आसाम, बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी याठिकाणी निवडणुका पार पडत आहे. दरम्यान यासाठी सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे.

या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे. देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले आहेत, असा आरोप या अभिनेत्याने केला आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1377071667617271809?s=20

अभिनेता कमाल खान यांनी एक ट्विट करत म्हटले की, ‘कधीकधी मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, सत्य काय आहे? काय बरोबर आणि चुकीचे आहे? आणि मला रिप्लाय काहीच मिळत नाही. भारतीय ब्रिटिशांच्या अधीन होते हे प्रत्येक भारतीयांना ठाऊक आहे. # आरएसएसने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास नकार दिला. सरदार पटेल यांनी # आरएसएसवर बंदी घातली. पण आज आरएसएसचे लोक # देशभक्त आहेत आणि इतर सर्व # देशद्रोही आहेत’ काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही RSS ला यापुढे आता संघ परिवार म्हणणार नाही, असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!