🕒 1 min read
चेन्नई: देशात सध्या ५ राज्यात निवडणुकांचे रण तापले असून यामध्ये आसाम, बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी याठिकाणी निवडणुका पार पडत आहे. दरम्यान यासाठी सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे.
या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये आता भाजपने आपल्या जाहीरनाम्यात चक्क माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेचा व्हिडीओ दिल्याने कॉंग्रेस ने टीका केली आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडीओ स्वरूपातही तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्हिडीओ तयार करत असताना तामिळनाडू भाजपाने त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून व कार्ती चिदंबरम यांची पत्नी स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लिपही घेतली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्या नृत्यांगनाही आहेत. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडीओतील काही भाग भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओमध्ये समाविष्ट केला आहे.
Dear @BJP4TamilNadu, we understand 'consent' is a difficult concept for you to understand, but you cannot use Mrs Srinidhi Karti Chidambaram's image without her permission. All you've done is prove that your campaign is full of lies & propaganda. pic.twitter.com/CTYSK9S9Qw
— Tamil Nadu Congress Committee (@INCTamilNadu) March 30, 2021
भाजपाच्या या चुकीवर तामिळनाडू काँग्रेसनं टीका केली असून, विनापरवानगी क्लिप वापरल्यावरून सुनावल देखील आहे. तामिळनाडू भाजपाला उद्देशून टीकाही केली आहे. “सहमती घेणं तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. पण, तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी कार्ती चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केलंय की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे,” अशी टीका तामिळनाडू काँग्रेसनं केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

