🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला नेहमीच त्याच्या परखड मतांमुळे ओळखलं जात. सध्या वीरेंद्र सेहवागने खेळाडूंच्या फिटनेस बाबतही मत व्यक्त केलं आहे. सध्या कोणत्याही खेळाडूला सामना खेळण्यासाठी यो-यो टेस्ट पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट खेळाडूच्या फिटनेस संबंधित आहे.
मात्र, फिटनेसपेक्षा टॅलेंट जास्त गरजेचं आहे, असं सेहवाग ‘क्रिकबज’सोबत बोलताना म्हणाला. त्याचबरोबर यो-यो टेस्ट आधी असती तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच पास झाले नसते, असंही सेहवाग म्हणाला . “यो-यो टेस्ट पास न झाल्यामुळे कदाचित अश्विन आणि चक्रवर्ती यांना आंतरराष्ट्रीय सामना खेळता येत नाहीय. पण मी या गोष्टींना मानत नाही. टीममध्ये खेळाडूंच्या निवडबाबत अशाचप्रकारचे निकष असले असते तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण कधीच पास झाले असते. मी स्वत: या तीनही दिग्गजांना बीप टेस्टमध्ये पास होताना नाही बघितलं. बीप टेस्टमध्ये 12.5 गुण गरजेचे होते. पण सचिन, गांगुली आणि लक्ष्मण 10 किंवा 11 गुण आणायचे. मात्र, या खेळाडूंची स्कील चांगली होती”, असं सेहवागने सांगितलं.
“मला वाटतं फिटनेसपेक्षा स्कील जास्त जरुरीची आहे. जर तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅच हारत असाल, खेळाडूंमध्ये स्कीलची कमी असेल तर व्यर्थ आहे. याशिवाय ते चुकीचं आहे. जे चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करतात त्यांना खेळवायला हवं. कारण असेच खेळाडू कठीण काळात चांगली कामगिरी करुन दाखवू शकतात. याशिवाय असे खेळाडू फिल्डिंगसाठी देखील फीट असतात. त्याचबरोबर खेळाडूची फिटनेस हळूहळू चांगली करता येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- सॉफ्ट सिग्नल नंतर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय
- ‘माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण’
- ‘रिषभ पंतसाठी ही मोठी संधी’ ; पंतच्या समर्थनार्थ पॉटिंगकडून ‘खास बात!’


