Share

सॉफ्ट सिग्नल नंतर बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे.

जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. या लीगमध्ये कित्येक खेळाडूंची स्पप्न साकार झाली आहेत. मागच्यावेळी युएईमध्ये झालेली स्पर्धा यंदा भारतात होत आहे. मात्र स्पर्धा चालू होण्याअगोदर बीसीसीआयने एक निर्णय घेत सर्व संघाना धक्का दिला आहे.

बीसीसीआयच्या नियमांनुसार आता प्रत्येक संघाला 1 तास 30 मिनिटांमध्ये 20 षटकं पूर्ण करावी लागणार आहेत. याआधी 90 व्या मिनिटाला 20वी ओव्हर सुरू व्हायची. 90 मिनिटांमध्ये प्रत्येक टीमला अडीच-अडीच मिनिटांचे दोन टाईम आऊट मिळायचे. म्हणजेच प्रत्येक संघाला 85 मिनिटांमध्ये 20 ओव्हर टाकणं बंधनकारक आहे. मग आता या हिशोबाने प्रत्येक संघाला एका तासाला 14 पेक्षा जास्त षटकं टाकावी लागणार आहेत. संघाने जर वेळेत षटकं पूर्ण केली नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) कर्णधार विराट कोहलीची इच्छा पूर्ण केली आहे. वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल नियम हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. येत्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!