Share

‘माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण’

Published On: 

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र यंदा सर्वांचे लक्ष असणार आहे चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कामगीरीकडे. कारण मागील आयपीएल सत्रात चेन्नईच्या संघाची कामगीरी ही खुपच निराशाजनक राहिली होती. पहिल्यांदाच चेन्नईचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडला होता. आणि गुणतालीकेतही सर्वात खाली होता.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन करताना मला खूप आनंद होतोय. चेन्नई सुपर किंग्स ही लीग दुनियातील बेस्ट लीग आहे. या संघाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्यातही माही भाईच्या कुशल नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असल्याच्या भावना भारतीय कसोटी संघाची भिंत संयमी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केल्या आहेत. क्रिकबजशी तो बोलत होता.

चेन्नई सुपर किंग्समध्ये माझं पुनरागमन होतंय. मला खरंच खूप आनंद होतोय. याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही. यासाठी चेन्नईची फ्रेंचायझी, श्रीनिवासन तसंच माही भाईचे आभार, असं पुजारा म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!