मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही रिषभ पंतसाठी मोठी संधी असल्याचं दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.
‘रिषभ पंतमध्ये भरपूर क्षमता आहे. तो संघाचं नेतृत्व करु शकतो. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही रिषभवर संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे’ असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं.
युवा फलंदाज रिषभ पंतसाठी ही मोठी संधी आहे. आताच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध रिषभ पंतने बहारदार कामगिरी केली. याच्यात कोणतीच शंका नाही की कप्तानी करताना त्यांचं मनोबल नक्की वाढेल. त्याच्यासोबत कोचिंग करायला मला आवडेल तसंच मी उत्सुक देखील आहे. आम्ही आयपीएलसाठी उत्सुक आहोत आणि वाट पाहत आहोत, असं रिकी पॉटिंग म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा


