Share

बांगलादेश दौर्‍यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

दरम्यान नुकताच पंतप्रधान मोदींनी बांगलादेश दौरा केला मोदींचा हा दौरा आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणूक या योगायोग जुळून आलेला असताना यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशदौर्‍यादरम्यान पुरी कांडी येथील मातुआ समुदायाच्या मंदिरात भेट घेतली. यावरून तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार केली आहे. टीएमसीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तृणमूल कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे खासदार शांतनु ठाकूर यांना सोबत घेतले. त्यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नाही. बांगलादेशातील मंदिरांमध्ये जाण्याचे एकमात्र उद्दीष्ट मतदारांना प्रभावित करणे हे होते. या तक्रारीवर निवडणूक आयोग काय कारवाई करतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!