🕒 1 min read
मुंबई : शासकीय कामांमध्ये पॅनकार्ड अत्यंत महत्वाचे असते यामध्ये विशेषतः प्राप्तिकर विभागाने पॅनकार्डचा अनिवार्य कागदपत्रांमध्ये समावेश केलेला आहे. पॅन कार्डशिवाय बँकेत खाते उघडले जावू शकत नाही तसेच आयकर विवरणपत्रही भरता येत नाही.
या पार्श्वभूमीवर आयकर भरणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने पॅन कार्डला आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत निश्चित केली आहे. त्यामुळे आता जर तुम्ही पॅन कार्डला आधारशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड रद्द होऊ शकत. तसेच पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल.
पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने करता येईल
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
त्याच बरोबर जर आपण आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटद्वारे आपला पॅन आणि आधार लिंक करण्यास सक्षम नसल्यास आपण एसएमएसद्वारे आपल्या पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करू शकता. यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा. हे करण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN (12 अंकी आधार क्रमांक) (10 अंकी पॅन) टाईप करा आणि ते 567678 किंवा 56161 वर पाठवावे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- नांदेड जिल्हा; सिलिंडरच्या स्फोटात ३ घरे भस्मसात
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
