Share

रेल्वेच्या ‘त्या’ महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह दोघे कर्मचारी निलंबित

Published On: 

परभणी : अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करणे तसेच गंगाखेड रेल्वेस्थानकावरील कँन्टीन चालवू देण्यासाठी एक लाखाची लाच मागणार्‍या परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना औरंगाबाद येथील रेल्वेचे पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी निलंबित केले आहे.

परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह तेथील कर्मचारी संजय भेंडेकर, प्रेमदास पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा अर्ज मागे घेणे तसेच गंगाखेड रेल्वेस्थानकात असलेले कँटीन चालवू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देखील दिली होती. तक्रारीची पडताळणी केली.  त्यावेळी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडे यांच्यासह अन्य दोघा कर्मचार्‍यांनी लाच मागितल्याने गुरुवारी (दि. २५) दुपारी सापळा लावला होता. त्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारून संजयकुमार भेंडेकर हा कर्मचारी रकमेसह फरार झाला.

या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडे यांच्यासह कर्मचारी संजयकुमार भेंडेकर, प्रेमदास पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या तिघांवरही गुन्हा दाखल झाल्याने रेल्वेचे पोलिस अधिक्षक वैभव कलूबर्मे यांनी गुरुवारी (दि.25) रात्री साडेनऊ वाजल्यापासून निलंबित देखील केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय औरंगाबाद असणार आहे, असेही निलंबन केलेल्या आदेशात पोलिस अधिक्षक कलबुर्मे यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!