Share

अल्पवयीन मुलीचे विवाह प्रकरण, पतीसह आईवडील, सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्यात मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लग्न लागली, या काळात अनेक बालविवाह सुद्धा झाल्याचे दिसून आले. अशाच एका बाल विवाह उघडकीस आला आहे. वडवणी तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुरुवारी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवणी तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी सध्या सातारा जिल्ह्यात राहते. २९ मे २०२० रोजी ती अल्पवयीन असताना तिचा विवाह लावण्यात आला.

७ मार्च २०२१ रोजी ती सातारा जिल्ह्यातील एका प्रसूतीगृहात दाखल झाली तेव्हा तिचा अल्पवयात विवाह लावल्याचे निदर्शनास आले. कराडा पोलीस ठाण्यात मुलीचे आई-वडील, सासू, सासरे व पतीवर बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.हा गुन्हा वडवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तपास सहायक निरीक्षक नितीन मीरकर करत आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अनेक बालविवाह झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. येणाऱ्या काळात असे अनेक प्रकरण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात प्रशासनाकडून मोठ्या जनजागृतीची अपेक्षा केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!