Share

भारताचा पराभव, इंग्लंडची वन डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जॉनी बेअरस्टोचा शतकी अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा  6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 124 धावांची खेळी साकारणाऱया जॉनी बेअरस्टोची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता तिसरा व अखेरचा सामना रविवारी पुण्यातच रंगणार आहे.

भारताकडून मिळालेल्या 337 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या जोडीने 110 धावांची भागीदारी रचली. दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे जेसन रॉय 55 धावांवर धावचीत झाला. या खेळीत त्याने एक षटकार व सात चौकार मारले.

जेसन रॉय बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूंत दहा सणसणीत षटकार व चार दमदार चौकारांसह 99 धावांची खेळी साकारली. भुवनेश्वरकुमारच्या बाऊन्सरवर तो यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद झाला, पण तोपर्यंत त्याने इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!