🕒 1 min read
पुणे : येत्या ९ एप्रिलपासुन आयपीएलचा १४वा हंगाम सुरु आहे. मागील मोसमात खराब कामगीरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. मागील वर्षी आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्सचा संघ साखळीफेरीत बाद झाला होता. तसेच स्पर्धेत पहिल्यांदा बाहेर पडणारा संघ चेन्नईचा होता. गुणतालीकेत चेन्नईचा संघ सर्वात तळाला होता. मात्र यंदा चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन करेल असे चेन्नईच्या चाहत्यांना वाटत आहे.
दमदार पुनरागमनासाठी चेन्नईच्या संघात एका नवीन वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. फजलहक फारूखी असे या गोलंदाजाचे नाव आहे. हा युवा गोलंदाज अफगाणिस्तानचा आहे. बुधवारी तो चेन्नई संघाच्या सराव सत्रात शामील झाला आहे. फजलहक फारुखीने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून एक टी-२० सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने २७ धावा देत एक गडी बाद केला आहे. या बरोबरच फारुखीने १२ प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत.
सद्दस्थीतीत फारुखी हा चेन्नई संघासाठी नेट बॉलर म्हणून काम करत आहे. त्याच्या बरोबर दक्षिण अफ्रिकेचा हार्दुस विलजॉन हा देखील चेन्नईच्या संघासाठी नेट बॉलर म्हणून काम करत आहे. चेन्नईच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकतीच चेन्नईच्या संघाची नवीन जर्सीचे अनावरण केले. तर चेन्नईच्या संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने संघात पुनरागमव केले आहे. मुंबईला पोहोचल्यांनतर रैनाने फोटो सोशल मीडीयावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
