Share

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार; देशमुखांच्या अडचणी वाढणार ?

Published On: 

मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणासंदर्भात भाजपने सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. सचिन वाझेंच्या नियुक्तीवरून आरोप करत भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, वाझेंच्या नियुक्तीवरून व काही गंभीर चुकांमुळे पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले.

यामुळे परमबीर सिंह हे नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केल्या आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिन्याभरात १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट द्यायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी शासनाच्या आदेशालाच आव्हान दिलं आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून उद्याच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका –

‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे. तर, 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं,’ असं परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!