🕒 1 min read
सिंधुदुर्ग : देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, आता या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस समोर आली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा समावेश करण्यावरून नितीन राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री व पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर मागवर्गीयांच्या या हक्कासाठी स्वतः देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
‘दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल,’ असं आवाहन नितीन राऊत कार्यकर्त्यांना केलं आहे.
हे बघून कोण म्हणेल हे सरकार आहे?? एक मंत्री दुसऱ्या मंत्री वर मोर्चा काढा म्हणतायत. हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही कारण सरकार मधल्या मंत्र्यानीच एक दुसऱ्याची जिरवायला सुरुवात केली आहे. https://t.co/HrzB7y6aBB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 23, 2021
नितीन राऊत यांच्या या वादामुळे मंत्र्यांमधला बेबनाव समोर आला आहे. तर, नितीन राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘हे बघून कोण म्हणेल हे सरकार आहे?? एक मंत्री दुसऱ्या मंत्री वर मोर्चा काढा म्हणतायत. हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही कारण सरकार मधल्या मंत्र्यानीच एक दुसऱ्याची जिरवायला सुरुवात केली आहे.’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- डिजिटल माध्यम क्षेत्रात ‘महाराष्ट्र देशा’ची गरुडझेप…
- मोठी बातमी! जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी उडवली, तीन जवान शहीद
- …अन् विश्वविक्रमी खेळीनंतर पांड्या बंधूंसाठी भावुक क्षण; कृणालला आनंदाश्रू झाले अनावर
- ‘या’ कारणामुळे अजित पवार यांनी केले आनंदी गोपाळ या चित्रपटाचे कौतुक
- मुख्यमंत्र्यांची ‘ती’ मागणी अखेर मान्य; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे जाहीरपणे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

