Share

मोठी बातमी! जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी उडवली, तीन जवान शहीद

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : छत्तीसगडमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली आहे. या घटनेत तीन जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५० च्या आसपास जवान या प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे.

हल्ल्यातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिदुर्गम भाग असल्याने नेटवर्क नाही, त्यामुळे माहिती मिळवण्यासही अडचणी येत आहेत. जखमी जवानांना मदत पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या सगळया कॅम्पमधून मदतीसाठी जवान रवाना करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नारायणपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!