🕒 1 min read
पुणे : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय संपादन केल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज असणाऱ्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली वर दोन सामन्याची बंदी येऊ शकते. कारण आयसीसीच्या नियमानुसार कर्णधार कोहली दोषी ठरला आहे. टी-२० मालिकेत झालेल्या एका चुकीमध्ये जर कोहली दोषी आढळला तर त्यावर ही कारवाई होऊ शकते.
आयसीसी नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या खात्यात २४ महिन्यात ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरीट गुण जमा झाले तर त्याचे दोन सामन्याची निलंबन होत असते. कोहलीच्या खात्यात सद्दस्थीतीत २ गुण जमा आहेत. मात्र टी-२० मालिकेत केलेल्या चुकीत जर कर्णधार कोहली दोषी आढळला तर त्याच्या गुणात आणखी दोन डिमेरीट गुण जमा होतील. त्यामुळे कर्णधार कोहलीच्या खात्यावर एकूण ४ डीमेरीट गुण जमा होतील.
याआधारे कर्णधार कोहलीवर दोन सामन्याच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. यापुर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंचासोबत हुज्जत घातल्यामुळे त्याला दोन डीमेरीट गुण देण्यात आले होते. यानंतर टी-२० मालिकेत पाचव्या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाला तेव्हा कोहलीने त्याच्याविरुद्ध असभ्य शब्द वापरले होते आणि असभ्य वर्णन केले होते. जर याप्रकरणी कोहली दोषी आढळला तर त्यावर कारवाई होऊन आयसीसी नियमानुसार त्याच्यावर दोन सामन्याची बंदी येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे
- ए भाई , तू जो कोण असशील… माझ्यावर बोट उचलायचं न्हाय – अमृता फडणवीस
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाद्वारे सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती
- ‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
- मोठी बातमी : पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल


