Share

ए भाई , तू जो कोण असशील… माझ्यावर बोट उचलायचं न्हाय – अमृता फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपसहित सगळ्याच विरोधकांनी लाऊन धरली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमकतेला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उत्तर दिले आहे. माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असं देखील भाई जगताप म्हणाले आहेत.

भाई जगताप यांची ही टीका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत भाई जगताप यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’… अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना खडसावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!