🕒 1 min read
अहमदाबाद : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर शेती उद्योगात व्यस्त आहे. १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या शेतमालाला रांचीच्या भाजी बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. मटार आणि टॉम्याटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरग्यानिक कॉलीफ्लॉवरलाही मोठी मागणी आहे. आणि आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वेळ काढत धोनीने शेती करण्यास सुरुवात केली होती. काहीतरी हटके म्हणून त्याने सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केलेला. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात तो जातीने शेतीवर लक्ष देत होता. त्याने आपल्या शेतामध्ये विविध फळभाज्यांची लागवड केलेली. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची विक्री करण्यास देखील सुरुवात केली.
धोनीच्या शेतात पिकलेल्या मालाला चांगली मागणी वाढल्याने धोनीने आपल्या उत्पादनाचे ‘रिटेल काऊंटर’ सुरु केले. या रिटेल काऊंटरवर फळे, भाजी व दुधाची विक्री होत असून, चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. रिटेल काउंटर सुरू केल्यावर पहिल्या दिवशी स्ट्रॉबेरी, तुती, पपई, दूध आणि तूप यासारखी उत्पादने त्वरित विकली गेली. हिरव्या भाज्या तसेच मटार, बाण, सोयाबीन, भोपळा आणि ढोबळी मिरची या फळभाज्या विकल्या गेल्या. धोनीच्या डेअरी फार्ममधील दूध व तूपदेखील हातोहात विकले गेले. धोनी तब्बल ४३ एकर इतक्या जागेमध्ये सेंद्रिय शेती व डेअरी व्यवसाय चालवत आहे.
दरम्यान, धोनीने अलीकडे त्याच्या शेतात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. त्याच्या या यशाच्या बातम्या अनेक वृत्तमाध्यमांनी कव्हर केल्या होत्या. यानंतर आता तो ‘सर्वश्रेष्ठ गोपालक’ही बनला आहे. बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने (BAU) धोनीला हा मानाचा पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाद्वारे सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती
- ‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
- मोठी बातमी : पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल
- विनामास्क फिरणार्या नागरिकांना प्रशासन करणार क्वॉरंटाईन
- पुणेकरांनो कोरोना नियम पाळा, शहरातील परिस्थिती चिंताजनक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

