Share

औरंगाबाद विभागातील एस.टी.महामंडळाचे कर्मचारी मुंबईला पाठवू नका खा. सय्यद इम्तियाज जलील यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.महामंडळ) मुंबईच्या बेस्ट प्रशासनास सहकार्य करण्यासाठी औरंगाबाद विभागातून पाठविण्यात येणारे कर्मचारी मुंबईला पाठवू नका या मागणीचे निवेदन खा.सय्यद इम्तियाज जलील यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात मुंबईला कर्मचारी पाठविणे धोक्याचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद विभागातून मुंबईला बेस्ट च्या सहकार्यासाठी प्रत्येक आठवड्यात एस.टी.महामंडळाचे २०० ते २५० कर्मचारी (चालक/वाहक) पाठविण्यात येतात. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढता असल्याने एस.टी.महामंडळाच्या कर्मचाNयांत चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने मुंबईला कर्मचारी पाठवू नये अशी मागणी करण्यात येत असून त्या मागणीला एस.टी.प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. दरम्यान, राज्याच्या इतर विभागातून मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी कर्मचारी पाठविणे बंद करण्यात आले असले तरी औरंगाबाद विभागातून कर्मचारी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्मचाNयांत नाराजीचा सुर उमटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!