Share

दहावी-बारावीची लेखी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत खूप विचार केला गेला पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. इयत्ता दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा २३ एप्रिल ते २० मे नियोजित वेळपत्रकानुसार ऑफलाईनच होणार, परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेत होणार, ८० मार्कच्या लेखी परिक्षेसाठी अर्धा तास वाढवून देण्यात येणार आहे, पेपरसाठी साडे तीन तास वेळ मिळणार आहे , ४० ते ५० मार्कसाठी असलेल्या परिक्षेसाठी १५ मिनिटे वाढवून देणार, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार आहे. लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. तसेच दिव्यांग विध्यार्थ्यांना १ तासाचा अधिकचा वेळ असेल. यावर्षी परीक्षा हि अर्धा तास आधी सुरु होणार आहे. परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०:३० वाजता सुरु होणार आहे. लेखन सराव कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या काळात कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन , कन्टेनमेंट झोन , संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल . सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा असाइनमेंट सादर करण्यास १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल . सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!