मुंबई – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे चालणाऱ्या कागल येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी प्रश्नपत्रिकेत देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्वाची शिकवण संपूर्ण देशाला देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी पद्धतीने करून देशातील तमाम जनतेच्या मनातील महापुरुषांचा अवमान केला आहे असा आरोप भाजपने केला आहे.
हे केवळ संतापजनक नसून निषेधार्थ सुद्धा आहे, त्यामुळे हसन मुश्रीफांनी ही प्रश्नपत्रिका तात्काळ मागे घेऊन संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करत, 24 तासांच्या आत ही प्रश्नपत्रिका मागे न घेतल्यास या विरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सतत अशा प्रकारची हिंदू विरोधी व समाजात तेढ निर्माण करणारी व महापुरुषांचा अपमान करणारी कामे करण्याचा सपाटा लावला आहे. दारूची दुकाने बार, मॉल, हे सर्व सुरू असताना सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ केली, मंदिरांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले, केवळ हिंदू उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले, आषाढी वारी करिता दिलेल्या बसचे भाडे आकारण्यात आले, हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या व भडकाऊ भाषण देणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कडक निर्बंध लादण्यात आले, इतक्यावर हे सरकार थांबले नसून आता महापुरुषांचा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस सुद्धा या महाविकास सरकार मधील नेत्यांमध्ये आले असून आता राज्यातील जनताच यांचा हा माज उतरल्याशिवाय राहणार नाही, असे सुद्धा आ. अतुल भातखळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

