मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा समोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एन आय ए ने चौकशी करून अटक केली आहे. मुकेश अंबानी हे लाखो लोकांना रोजगार देणारे उद्योजक आहेत. त्यांचे घर उडविण्याच्या षडयंत्रा मागे कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा, अमित शाहांना पाठवलं पत्र !
स्फोटक प्रकरणासह आतंकवादी गुन्हे प्रकरणात वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्यासाठी आपण लवकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी आज केले.
‘सचिन वाझे यांचा शिवसेनेशी अनेक वर्षे संबंध राहिला आहे. वाझे सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा शिवसेना आणि राज्य सरकारचा प्रयत्न चुकीचा होता. सचिन वाझे यांचे गॉडफादर कोण हे शोधले पाहिजे. या प्रकरणाचा लवकर उलगडा झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत लॅविश रहा, मात्र करोडोंचा खर्च स्वतः केला की सरकारी तिजोरीतून केला हे सांगा’
- ‘हे माझं चुकलं का ?’ अंतर्गत कलहाला कंटाळल्याने भाजप नगरसेवकाची पोस्टरबाजी
- पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली ? सूर्यकुमारनं सांगितलं गुपित !
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
