मुंबई : सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्शन कट केली जात आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी काल केला आहे.
यावर आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणाले कि, ‘मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का? मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो.
माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही’ असं सांगत नितीन राऊत म्हणाले की, ‘सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे.
नितीन राऊत म्हणाले की, ‘मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवतं हे बघितलं पाहिजे. नुसतं बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझं खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे.
लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.
फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत’ असंही नितीन राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची परिस्थिती बनली बिकट, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
