🕒 1 min read
उस्मानाबाद : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे कर्नाटक सरकार चिंतेत आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून उस्मानाबादच्या उमरगा तालुक्याजवळील कलबुर्गी मार्गावरील खजुरी आणि हैदराबाद मार्गावरील तलमोड सिमेवर नाकाबंदी सुरू केली होती. मात्र, रुग्णांची संसर्ग वाढतच असल्याने आता तर कर्नाटकातील कलबुर्गी प्रशासनाने गुरुवारपासून महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस बंद केल्यात.
मिळालेल्या माहितीनूसार, औरंगाबाद-कलबुर्गी बस खजुरी बॉन्ड्रीवर पोलिसांनी थांबवली. प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याचा पावित्रा घेण्यात आला. त्यामुळे बस परत उमरगा आगारात आली. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांनी शार्टकर्ट रस्त्याने प्रवास करत घर गाठले. एक बस रोखल्यामुळे दुपारी चारनंतर उमरगा येथून जाणारी जालना-कलबुर्गी आणि औरंगाबाद-गाणगापूर या दोन्ही बसेस उमरगा आगार प्रशासनाने बसस्थानकातच थांबवल्या.
कर्नाटकातून खुलेआम प्रवाशी येतात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाने खबरदारीचा घेतला आहे. मात्र, कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसना मात्र मुभा आहे. तिकडून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणीचे बंधन नाहीये. या विरोधाभासामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तामिळनाडूप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी केंद्राने हायकोर्टात शपथपत्र द्यावे’
- ह्रदयद्रावक घटना! आईची मुलासह आत्महत्या, प्राण गेल्यानंतरही चिमुकल्यावर घट्ट पकड
- धक्कादायक! बसमध्ये ८१ प्रवासी; जिंतूर येथील एस.टी. आगारात कोरोना नियम धाब्यावर
- यांच्यावर कारवाई होणार का? कोरोना तपासणी करणारे कर्मचारीच मास्कविना
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, मध्यप्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
