🕒 1 min read
नागपूर : मराठा आरक्षण संदर्भात ठाकरे सरकार आधीच अडचणीत आले आहे. एकीकडे आर्क्षांसाठी मराठा समाज आक्रमक झाला असताना आता राज्य सरकार ओबीसी समाजाच्या आक्रोशाला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. माजी उर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बनवाकुले यांनी राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ते नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होर्ते.
ओबीसींचा डाटा देत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण राहणार नाही. त्यामुळे ओबीसींना निवडणूक लढवण्यात अडचणी येणार आहेत. राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्यानेच ओबीसींवर ही वेळ आल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. राज्य सरकार ओबीसींचा डाटा देऊ शकलं नाही. त्यामुळे आरक्षण ठरवता येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याचाच अर्थ जोपर्यंत सरकार डाटा देत नाही तोपर्यंत आरक्षण ठरवता येणार नाही. 14 महिन्यांपासून सरकारला डाटा गोळा करण्यासाठी वेळ होता. परंतु सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचं काम केलं आहे. सरकार उदासीन आहे. त्यांनी आयोग स्थापन केलाच नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असून आता ओबीसींना आरक्षित जागेवर निवडणूकही लढवता येणार नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी सरकारला आता गाव पातळीवर डाटा तयार करावा लागेल. आम्ही आयोग नेमला आहे. डाटा गोळा करण्यासाठी थोडा वेळ द्या, असं कोर्टाला सांगता आलं असतं. पण सरकारने आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टाकडे वेळ कसा वाढवून मागणार? असा सवाल करतानाच या दुराचारी सरकारमुळेच ओबीसींवर संकट आलं असून आपलं पाप लपवण्यासाठी हे भाजपच्या सरकारचं पाप असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत, असंही ते म्हणाले.
पहा चंद्रशेखर बावनकुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/424842185282089
महत्वाच्या बातम्या
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- वाझे प्रकरण हे सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड, याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का? – कॉंग्रेस
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
- #RippedJeans ट्रेंड वरील ट्वीट वरून कंगना झाली ट्रोल
- भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; आयसीसीने पात्रता फेरी केल्या स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
