Share

#RippedJeans ट्रेंड वरील ट्वीट वरून कंगना झाली ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत बोलत असताना, महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होत.

रिप्ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे आहे. यामुळे अनेक महिला नेत्या आणि मुली तसेच सेलिब्रेटीने यावर प्रतिक्रिया दिल्या असून रावत यांच्या विधानाचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर #RippedJeans ट्रेंड करतोय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या विधानाची तीव्र निंदा होतेय.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तीरथ यांच्या विधानावर दिल्या नंतर नेहमीच आपल्या ट्वीट मुळे चर्चेत असलेली कंगना राणौत का मागे राहणार? आता तिनेही यावर ट्विट केले आहे. ‘कंगनाने स्वत:चे काही फोटो ट्विटरवर पोस्ट केलेत. यात ती रिप्ड जीन्समध्ये दिसतेय. याफोटोंसोबत तिने लिहिले,’रिप्ड जीन्स घालणार असाल तर या फोटोंइतका कूलनेस असू द्या. जेणेकरून तुम्ही स्टायलिश दिसाल, नाहीतर बेघर भिकारी दिसाल. आजकालचे तरूण असेच दिसतात.’

त्यानंतर फाटक्या जीन्सबद्दलही कंगनाने तत्त्वज्ञान दिलेले पाहून अनेक युजर्सनी कंगनाला ट्रोल केले. बहन, इसमें भी बोल पडी, असे एका युजरने लिहिले. ‘पद्मश्री कंगना राणौतने म्हटले ना, मग आजपासून नो रिप्ड जीन्स…,’ अशी उपरोधिक कमेंट अन्य एका युजरने केली. एका युजरने यापुढे जात कंगनाला फैलावर घेतले. ‘कपड्यांवरून धर्म सांगणारे आता फाटक्या जीन्सवरून गरीब-श्रीमंत, बेघर हेही सांगणार का?,’ असे या युजरने लिहिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!